Type Here to Get Search Results !

कौतुकास्पद! लॉकडाउनमध्ये घरीच तयार केले स्वतःचे ४ सीटर विमान!



केरळ: पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवून अशोक अलीसेरिल थमारक्षण यांनी चक्क विमान तयार केले. आता या खासगी विमानातून ते कुटुंबीयांसोबत अख्खं जग फिरत आहे.



कोरोना संकटकाळातही  केरळच्या अशोक अलीसेरिल थमारक्षण यांनी लॉकडाउनमध्ये मिळालेल्या वेळेचा सदुपयोग केला. त्यांनी घरच्या घरीच आपल्या कुटुंबासाठी विमान तयार केले. चार जणे बसू शकतील असे विमान तयार केले. आता या विमानातून ते जगभर फिरत  आहेत. जी-दिया असे या विमानाचे नाव असून, त्यांनी त्यांच्या लहान मुलीच्या नावाचे आहे.



दरम्यान, अशोक यांनी सांगितले की, जेव्हा कधी कुटुंबीयांसाठी कुठे ये-जा करण्यासाठी प्लेन हायर करत होतो, त्यावेळी दोन आसनीच विमान मिळायचे. त्यांच्या कुटुंबात चार जण आहेत. ते स्वतः आणि पत्नी, दोन मुले असं त्यांचं कुटुंब आहे. चार आसनी विमान मोठ्या मुश्किलीने मिळायचे. त्यामुळे त्यांनी स्वतःचं चार आसनी विमान तयार करण्याचा निर्धार केला. आता त्यांचे हे स्वप्न प्रत्यक्षात उतरले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies