Type Here to Get Search Results !

श्रीलंकेच्या नवीन राष्ट्राध्यक्षपदी रानिल विक्रमसिंघे यांची निवड!



कोलंबो : श्रीलंकेत आज देशाच्या नव्या राष्ट्रपतीची निवड करण्यात आली. रानिल विक्रमसिंघे यांची श्रीलंकेच्या नवीन राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली आहे. विक्रमसिंघे ६ वेळा श्रीलंकेचे पंतप्रधान राहिले आहेत. 



अध्यक्षपदाच्या शर्यतीत, विक्रमसिंघे यांचा सामना दुल्लास अलाहपेरुमा आणि अनुरा कुमारा दिसानायके यांच्याशी होता. स्थानिक वेळेनुसार सकाळी 10 वाजता मतदानाला सुरुवात झाली. पहिले मत स्पीकरने तर दुसरे मत रानिल विक्रमसिंघे यांनी दिले.राष्ट्रपतीपदासाठी एकूण 219 जणांनी मतदान केले.



दरम्यान, विक्रमसिंघे हे यापूर्वी दोनदा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पराभूत झाले होते. मात्र यावेळी त्यांनी बाजी मारली. त्यामुळे आता विक्रमसिंघे हे श्रीलंकेचे नवीन राष्ट्रपती असणार आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies