“बंडखोर गटाला चंद्रावर देखील ताबा हवा...” संजय राऊतांची शिंदे गटावर टीका!मुंबई : लोकसभा अध्यक्षांनी राहुल शेवाळे यांच्या गटनेते पदाला मान्यता दिली. आम्ही दिलेल्या पत्राला अजुनही उत्तर दिलेले नाही. आज सर्वाच्च न्यायालयात आम्हा सर्वांना न्याय मिळेल, याची आम्हाला खात्री आहे. ज्या पध्दतीने फुटीर गटाच्या गटनेते पदाला मान्यता दिली जाते. ती चुकीची आहे. बंडखोर गटाला चंद्रावर देखील ताबा हवा आहे, अशी टीका संजय राऊत यांनी शिंदे गटावर केली आहे.तसेच ते पुढे म्हणाले, ”आमचे लक्ष आहे. आज सुनावणी सुरु होईल. आमच्या सर्वोच्च न्यायालात आम्हाला न्याय मिळेल अशी आम्हाला खात्री आहे. त्यांना जी काही लढाई लढायची आहे. ती त्यांना लढू द्या. ते आमचे सहकारी होते. आजही सहकारी होते. प्रत्येकाचे वेगळे कारण आहे. प्रत्येकाला ते कारण माहित आहे, असेही राऊत यांनी वक्तव्य केले.याशिवाय,  भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी २०१९ च्या युतीबद्दल काल केलेल्या विधानावर भाष्य करताना राऊत म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी केलेले विधान दानवे यांनी ऐकले आहे का, दानवे यांना याबाबतची एक क्लीप मी पाठवतो. ते इथे माझ्या शेजारी राहायला आहेत. २०१४ ते २०१९ मध्ये झालेल्या घटनेला कोण जबाबदार कोण आहेत. रावसाहेब दानवे हे पुढच्या टर्ममध्ये निवडून येतील का, त्यामुळे त्यांना हे बोलण्याची मजबूरी आहे, असा टोलाही संजय राऊत यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर लगावला.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured