Type Here to Get Search Results !

“पेन्शन हवी तर किस दे”: जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्याची महिलेकडे मागणी!



पुणे :  पुण्यात  दिवंगत पतीची पेन्शन हवी तर किस दे अशी मागणी एका महिलेकडे जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्याने केल्याचा आरोप महिलेने केला आहे. याबाबत महिलेने जिल्हा परिषदेकडे तक्रार दाखल केली आहे. माहितीनुसार संबधित कर्मचारी हा आरोग्य विभागात कामाला आहे. 



याबद्दल अधिक माहिती अशी कि,  पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामध्ये पूर्वी कार्यरत असलेल्या आपल्या दिवंगत पतीच्या पेन्शन घेण्यासाठी तक्रारदार विधवा महिला आली होती. यावेळी जिल्हा परिषदेत उपस्थित असलेल्या एका कर्मचाऱ्याने या महिलेला पेन्शन मिळवून देण्यासाठी चक्क किसची मागणी केली. असा आरोप महिलेने केला आहे. तसेच,  पतीची पेन्शन घेण्यासाठी आपण अनेकवेळा चकरा मारल्या असल्याचेही तक्रारदार महिलेने सांगितले. प्रत्येक वेळी पुन्हा येण्याचे सांगत कर्मचाऱ्यांनी पेन्शन देण्यास टाळाटाळ केली. यावेळी आल्यानंतर कर्मचाऱ्याने किस दे अशी मागणी केली असल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला. 



दरम्यान,  महिलेने मुख्य कार्यकारी आयुष प्रसाद यांच्याकडे याबद्दलची तक्रार केली. तक्रार प्राप्त होताच या कर्मचाऱ्याला चौकशी होईपर्यंत निलंबित देखील करण्यात आले आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies