Type Here to Get Search Results !

'रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका...'; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे ट्विट व्हायरल!




मुंबई : एकनाथ शिंदे सरकारने काल विधानसभेत बहुमत चाचणी जिंकली. त्यावेळी शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर टीका केली. तर खासदार संजय राऊत आणि अन्य काही शिवसेना नेत्यांनी शिंदे यांना रिक्षावाला म्हणत त्यांच्यावर भरसभेत टीका केली होती. त्यानंतर आता मुख्यमंत्री शिंदे यांनी एक ट्विट करत उद्धव ठाकरेंवर  जोरदार  टीका केली आहे. 



तसेच, एकनाथ शिंदे सरकारने काल विधानसभेत विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकला. कालचा पूर्ण दिवस सत्ताधारी आणि विरोधी नेत्यांच्या भाषणांमुळे जोरात रंगला.



त्यावेळी, एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिलेली वागणुकीबद्दल भाष्य केलं होतं. तसेच बंडखोरीनंतर काही शिवसेना नेत्यांनी एकनाथ शिंदे यांना रिक्षावाला म्हणत भरसभेत टीका केली होती. त्यानंतर 'रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला.. कारण हे सर्वसामान्यांचं सरकार', असे ट्विट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार  टीका केली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies