Type Here to Get Search Results !

आजचे राशीभविष्य, रविवार १० जुलै २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!


मेष:-

उत्तम कौटुंबिक सौख्य मिळेल. हातून एखादे चांगले काम होईल. जुन्या मित्रांसोबत दिवस मजेत घालवाल. खाण्या-पिण्याची चंगळ राहील. प्रयत्नात कसूर करून चालणार नाही.


वृषभ:-

गोड बोलून कार्यभाग साधाल.  हाती घेतलेल्या कामाकडे आधी लक्ष द्यावे. बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे. दिवसभर काहींना-काही काम मागे राहील. अरबट-चरबट खाऊ नका.मिथुन:-

अधिक उत्साहाने कामे कराल. कौटुंबिक जबाबदारीची जाणीव ठेवाल. प्रसन्नता पूर्वक दिवसाची सुरुवात होईल. मनमोकळ्या गप्पा मारता येतील. दिवस चांगला जाईल.


कर्क:-

अति श्रमामुळे थकवा जाणवेल. फसवणुकीपासून सावध राहावे.  मनात अनामिक चिंता निर्माण होईल. भावनेच्या आहारी जाऊ नये. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. सिंह:-

चांगले मानसिक स्वास्थ लाभेल. जवळचे मित्र भेटतील. कलात्मक दृष्टीकोन ठेवाल. आंतरिक सृजनशीलता लाभेल. काहीतरी नवीन करण्याची ऊर्मी दाटून येईल.


कन्या:-

स्वत:च्या फायद्याकडे अधिक लक्ष द्याल. कामाची धांदल उडेल. वेळ आणि काम यांचा मेळ घालावा. हातातील कामे सुरळीत पार पडतील. आपल्याला सातत्याची गरज भासेल.तूळ:-

गोड बोलण्याला भुलून जाऊ नका. धार्मिक अनुष्ठान साधाल. आत्मविश्वास वाढीस लागेल. परोपकारातून परमार्थ साधता येईल. कमी श्रमातून अधिक फायद्याचा विचार कराल. 


वृश्चिक:-

मित्रांना दुखावून चालणार नाही.  नातलगांची गाठ पडेल. सारासार विचार करण्यावर भर द्यावा लागेल. चटकन कोणत्याही निष्कर्षावर येऊ नका. तुमच्यातील क्रोधाला खतपाणी घातले जाईल.धनू:-

जुनी कामे नव्याने अंगावर येतील. मित्रांच्या भेटीने आनंद होईल. सुरस भोजनाची प्राप्ती होईल. जोडीदाराकडून समाधान मिळेल. मुलांच्या सौख्यात आनंद मानाल.


मकर:-

इतरांचा विश्वास संपादन करावा. तब्येतीच्या किरकोळ तक्रारी कमी होतील. किरकोळ जखमांकडे दुर्लक्ष करू नये. व्यवसायात सरकारी हस्तक्षेप वाढेल. धार्मिक व्यवहारात लक्ष घालाल. कुंभ:-

आपल्या मनातील गुज मोकळेपणाने सांगावे. नवीन कामे अंगावर येतील. दिवस गप्पा-गोष्टींमध्ये घालवा. फक्त शब्दांची धार लक्षात घ्यावी. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील.


मीन:-

पत्नीशी मतभेदाची शक्यता. व्यापार्‍यांची येणी वसूल होईल. मुलांचे विचार जाणून घ्यावेत. घाईने केलेले काम चुकू शकते. कामात चांगली सफलता मिळेल.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies