Type Here to Get Search Results !

शिवसेना शाखेसमोर एकाची गोळीबार करत केली हत्या!



अंबरनाथ : अंबरनाथमध्ये शिवाजीनगर परिसरात काल दुपारच्या सुमारास एकाची हत्या व्यक्तीची हत्या केल्याची घटना घडली आहे. तुषार गुंजाळ असे सबंधित मयत व्यक्तीचे नाव असून व्यावसायिक वादातून हा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 



याबद्दल अधिक माहिती अशी कि, अंबरनाथ पूर्वेतील शिवाजीनगर परिसरात शिवसेना शाखेसमोर दुपारच्या सुमारास गणेश गुंजाळ हा तरुण उभा असताना शंकर शिंदे आणि नेपाळी उर्फ थापा उर्फ रॉकी या दोन हल्लेखोरांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढवला. यावेळी गणेशला वाचवण्यासाठी त्याचा भाऊ तुषार गुंजाळ हा तिथे आला आणि हल्लेखोरांवर प्रतिहल्ला चढवला.



यावेळी हल्लेखोरांनी गावठी पिस्तूलातून तुषार याच्यावर एक गोळी झाडली. त्यानंतर गणेश गुंजाळ याच्यावरही गोळी झाडण्याचा प्रयत्न हल्लेखोरांनी केला. मात्र, पिस्तुल लॉक झाल्याने गोळी झाडल्या गेली नाही. त्यामुळे गणेशवर चॉपरने पुन्हा हल्ला चढवत हल्लेखोर तिथून पसार झाले.


या घटनेनंतर गोळी लागलेला तुषार हा पोलीस ठाण्यात गेला आणि तिथून एका खासगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी गेला. मात्र, त्याची प्रकृती अचानक गंभीर बनली आणि त्याचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. तर गणेश हा जखमी असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.दरम्यान, पुढील घटनेचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies