Type Here to Get Search Results !

पाळीव कुत्र्याचा मालकीनीवरच हल्ला; हल्ल्यात महिलेचा मृत्यू!

 


लखनऊ, उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये पिटबुल कुत्र्याच्या हल्ल्यात ८२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. पिटबुल जातीच्या या कुत्र्याने महिलेच्या चेहऱ्यावर आणि पोटावर हल्ला करत चिरफाड केली आहे. मंगळवारी पहाटे ५ वाजता ही घटना घडली. कुत्र्याने केलेल्या भयंकर हल्ल्यानंतर ही महिला गंभीर जखमी झाली त्यानंतर तिचा मृत्यू झाला.



याबद्दल अधिक माहिती अशी कि,  मंगळवारी हा पिटबुल कुत्रा घरात सुटलेला होता. पहाटे ५ वाजता कुत्र्याने महिलेवर अचानक हल्ला करत महिलेच्या पोटाला आणि चेहऱ्याला चावा घेतला होता. यात सुशीला नावाच्या ८२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. याबाबत मृत महिलेचा मुलगा अमित याने सांगितले की, हा मोठा अपघात होता. मलाही हे समजू शकले नाही. तो म्हणाला की, माझ्याकडे ३ वर्षांपासून दोन कुत्रे आहेत. एक पिटबुल आणि एक लॅब्रा. दोघेही आईसोबत खेळायचे. तसेच, या पिटबुलचा परवाना रद्द करण्यात आला आहे.



दरम्यान, लखनऊ कैसरबागच्या बंगाली टोलामध्ये पिटबुलला पकडण्यासाठी लखनऊ महापालिकेचे पथक पोहोचले. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies