मुंबई : पत्राचाळ पुनर्विकास प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या भांडुप येथील मैत्री या निवासस्थानी सकाळी ७ वाजताच्या सुमारास ईडीचे ८ ते १०अधिकारी पोहोचले आहेत. संजय राऊत आणि त्यांची पत्नी यांची चौकशी सुरु झाली. दरम्यान, साडेनऊ तासांनी ईडीने संजय राऊत यांना ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, राऊत यांना जुलै महिन्यात दोन वेळा चौकशीसाठी ईडीने समन्स जारी केले होते. मात्र ते अनुपस्थित राहिले. त्यानंतर आता रविवारी ईडीने ही छापेमारी करत संजय राऊत यांना ताब्यात घेतले आहे.