Type Here to Get Search Results !

यावर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सपत्निक करणार श्रीविठ्ठलाची महापूजा!



सोलापूर : निवडणूक आयोगाने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सपत्निक श्री विठ्ठलाची महापूजा करणार आहे. 

राज्यातील ९२ नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्याने आचारसंहिता सुरू झाली. यामुळे आता मुख्यमंत्र्याच्या हस्ते महापूजा होणार का असा प्रश्न निर्माण झाला होता. याबाबत जिल्हधिकारी मिलिंद शंभरकर यांनी निवडणूक आयोगाकडे पत्रव्यवहार केला होता.

दरम्यान, निवडणूक आयोगाने कोणतीही योजना किंवा निधीची घोषणा न करता मुख्यमंत्र्यांना श्रीविठ्ठलाची महापूजा करण्यास परवानगी दिली आहे. तसेच या कार्यक्रमासाठी आवश्यक त्या परवानग्या घेण्याची अट घातली आहे. कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यासही हरकत नाही. मात्र, त्याठिकाणीही कोणतीही घोषणा करता येणार नाही, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

तसेच, यावर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे या पहिल्यांदा श्रीविठ्ठलाची महापूजा करणार आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies