Type Here to Get Search Results !

“उद्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा उद्धव ठाकरे यांच्या बाजूने...”:अजित पवार यांचे वक्तव्य चर्चेत!



पुणे : मी उपमुख्यमंत्री होतो, आम्ही सत्तेत असताना काम करत होतो. काम करत असताना लावरे लगेच फोन अशी माझी ही शैली होती. मात्र फोन लावत असताना आम्ही आधी कधी कॅमेरा लावला नाही असा टोला विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.



तसेच पवार पुढे म्हणाले, शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या विषयी उद्या सर्वोच्च न्यायालयात जी सुनावणी होणार आहे. त्या सुनावणीत पक्षांतर बंदी कायदा जर तंतोतंत लागू केला तर उद्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागला पाहिजे असे मला सर्व तज्ञ वकिलांनी सांगितले आहे.



 महाविकास आघाडी सरकारने डीपीडीसीत जे निर्णय घेतले होते ते सर्व निर्णय आताच्या सरकारने रद्द केल्यास आम्ही उच्च न्यायालयात दाद मागू असा इशारा विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी एकनाथ शिंदे सरकारला दिला आहे.



दरम्यान, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज (रविवार) पुणे दौऱ्यावर आहेत. त्यादरम्यान माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काही निर्णयांवर नाराजी व्यक्त केली आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies