Type Here to Get Search Results !

पवारांनी स्थगिती उठवण्यासाठी केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी; म्हणाले, “माझ्या कामाचा श्रेय तुम्ही...”



पुणे: राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी कामाचा धडाका सुरू केला आहे. महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयांना स्थगिती देण्यात आली आहे. तर नव्या प्रकल्पांना मंजूरी देण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघातील कामांना स्थगिती देण्यात आला आहे. या संदर्भात आमदार पवार यांनी फेसबुक पोस्ट केली आहे. मतदार संघातील कामांवरील स्थगिती उठवण्यासाठी मुंख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली आहे. 



आमदार रोहित पवार यांच्या कर्जत-जामखेड या मतदारसंघात महाविकास आघाडी सरकारने दिवाणी न्यायालयाला मंजूरी दिली होती. या न्यायालयाला नव्या शिंदे-फडणवीस सरकारने रद्द केले आहे. या कामावरील स्थगिती उठवून पुन्हा मंजूरी देण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. माझ्या कामाचा श्रेय तुम्ही घ्या, पण दिवाणी न्यायालय करा अशी विनंती पवार यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies