नाशिक : सुप्रीम कोर्टाने ओबीसी समाजाला मोठा दिलासा दिला आहे. ओबीसी आरक्षणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. त्यात बांठिया आयोगाच्या अहवालानुसार निवडणूक घेऊन उर्वरित निवडणुकांचा कार्यक्रम २ आठवड्यात जाहीर करा. तसेच, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या आगामी निवडणुका ओबीसी आरक्षणानुसार घ्या, असेही निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहे.
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते, माजी मंत्री छगन भुजबळ सुप्रीम कोर्टाच्या ओबीसी आरक्षणाच्या निकालावर प्रतिक्रिया देत म्हणाले, “आम्ही ओबीसी आरक्षणाबाबत शंभर टक्के खुश नाही, त्यामुळे आरक्षण वाढवण्याची मागणी राज्य सरकारकडे करणार असल्याचे आमदार छगन भुजबळ यांनी सांगितले.
तसेच, ओबीसींना देशव्यापी २७ टक्के आरक्षण मिळावे अशी मागणी ते पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. दरम्यान, नाशकात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे भाष्य केले.