Type Here to Get Search Results !

आजचे राशीभविष्य, मंगळवार ५ जुलै २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!



मेष:-

जोडीदाराचा पाठिंबा मिळेल. आपल्या आवडत्या गोष्टी कराव्यात. नातेवाईकांकडून आनंद वार्ता मिळेल. प्रिय व्यक्तिला भेटवस्तू द्याल. गरजेच्या कामात अधिक वेळ घालवा.

वृषभ:-

मनात आशेचा नवीन किरण उठेल. आवडत्या वस्तूंची खरेदी करता येईल. मनात उगाचच नसती काळजी उत्पन्न होऊ देऊ नका. आर्थिक बाबतीत घरच्यांचा सल्ला मिळेल. जवळच्या मित्रांसोबत वेळ घालवाल.



मिथुन:-

आर्थिक प्रश्न सुटतील. उदासवाणी मनस्थिती दूर करता येईल. काही प्रश्न चर्चेतून सुटू शकतील. कौटुंबिक जबाबदार्‍या वाढतील. मात्र त्याबरोबर खर्च देखील वाढेल.

कर्क:-

मानसिक स्थिरता जपावी.  आर्थिक बाबतीत आपण सतर्क राहाल. त्यामुळे अधिक वेगाने कामे पूर्ण करावी लागतील. अनावश्यक गोष्टींवर खर्च होऊ शकतो. कामाची घाई-गडबड राहील.



सिंह:-

मानसिक समाधान लाभेल.  अपेक्षित असा व्यावसायिक लाभ होईल. आरोग्यात सुधारणा संभवते. कालगुणांना वाव द्यावा. कामाच्या ठिकाणी कौतुकास पात्र व्हाल.

कन्या:-

तडजोडीला पर्याय नाही हे ध्यानात घ्यावे. प्रगल्भ विचार करण्याची गरज भासेल. द्विधा मनस्थिती बाहेर पडावे लागेल.  मनातील वादळ शांत करण्याचा प्रयत्न करावा.  अति विचार करणे योग्य नाही.



तूळ:-

क्षुल्लक गोष्टीवर अडून राहू नका. प्रवासात काहीसा त्रास संभवतो. अपयशाने खचून जाऊ नका. संपर्कातील लोकांची मदत मिळेल. ओळखीतून कामे होण्याची शक्यता.

वृश्चिक:-

केलेल्या कामाचे समाधान मिळेल.  हातातील कामात मनाजोगे यश येईल. अपेक्षित लाभाने खुश व्हाल. नोकरीच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. सहकारी तुम्हाला वेळेवर मदत करतील.



धनू:-

आपला आनंद आपणच शोधावा. कौटुंबिक प्रश्नातून मार्ग काढाल. मुलांबरोबर खेळीमेळीने वागाल. जुन्या गोष्टी फार मनावर घेऊ नका. नातेवाईकांशी मतभेद वाढवू नका.

मकर:-

साहसाने कामात हात घाला. नवीन उद्दीष्ट सावधपणे हाताळा. कौटुंबिक कामात मन रमेल. प्रवास जपून करावा. अकारण आलेली निराशा झटकून टाका.



कुंभ:-

वादाचे मुद्दे फार ताणू नका. योग्य सल्ल्याशिवाय गुंतवणूक करू नका. प्रलंबित कामे मार्गी लागतील. आर्थिक बाबतीत अतिशय सतर्क राहावे. अविचाराने कोणताही निर्णय घेऊ नका.

मीन:-

मानसिक उत्साह वाढेल. इतरांना आपले मत मान्य करायला लावाल. अधिक जोमाने कामे कराल. आज कौटुंबिक कामात अधिक वेळ जाईल. आत्मविश्वास वाढीस लागेल.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies