Type Here to Get Search Results !

नीट परीक्षेवेळी विद्यार्थीनींना अंतर्वस्त्र काढण्यास पाडले भाग; पाच महिलांना अटक!



केरळ:  नीट परीक्षेला बसण्याआधी विद्यार्थीनींना जबरदस्ती अंतर्वस्त्र काढायला लावल्याची घटना केरळमध्ये घडली. याप्रकरणी पाच महिलांना अटक करण्यात आली आहे. 



याबद्दल अधिक माहिती अशी कि,  केरळमधील कोल्लम जिल्ह्यात आयूर येथील परीक्षा केंद्रावर तरुणींना नीट परीक्षेला बसण्याआधी अंतर्वस्त्र काढण्यासाठी सक्ती करण्यात आली. अंतर्वस्त्रांसह परीक्षेला बसू देणारा नाही असे सांगत जबरदस्तीने विद्यार्थीनींना अंतर्वस्त्र काढण्यास भाग पाडण्यात आले. त्यानंतर या प्रकरणी पीडित विद्यार्थीनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार नोंद केली.



दरम्यान,  या प्रकरणी तक्रार नोंदवल्यानंतर याप्रकरणात पाच महिलांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, परीक्षेआधीच्या तपासणीवेळी अंतर्वस्त्राच्या हुकमुळे मेटल डिटेक्टरमध्ये आवाज येत होता, यामुळे विद्यार्थीनींना अंतर्वस्त्र काढण्यास सांगितल्याचे समोर येत  आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies