Type Here to Get Search Results !

कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण; जाणून घ्या आजचे पेट्रोल – डिझेलचे दर!



नवी दिल्ली : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती पुन्हा एकदा घसरल्या आहेत. गुरुवारी सकाळी प्रतिबॅरेल 107 डॉलरवर पोहोचलेले ब्रेंट क्रूड शुक्रवारी प्रतिबॅरेल 104 डॉलरवर पोहोचले आहे. दरम्यान, कच्च्या तेलाचे दर कमी होताच पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल डिझेलचे नवे दर जारी केले आहेत.



सरकारी मालकीच्या तेल कंपन्यांनीही आज सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे किरकोळ दर जाहीर केले आहेत. आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. काही दिवसांपूर्वी क्रूडच्या किमती प्रति बॅरल 140 डॉलरच्या वर गेल्या होत्या. आता क्रूड 100 डॉलरच्या जवळ असताना, आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहण्याची शक्यता आहे. 



प्रमुख महानगरांमधील पेट्रोल-डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

मुंबई - पेट्रोल 106.35 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 94.28 रुपये प्रति लीटर.

दिल्ली - दिल्लीत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 96.72 आणि डिझेलचा दर 89.62 इतका आहे.

चेन्नई - चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये प्रतिलिटर आणि डिझेल 94.24 रुपये प्रतिलिटर इतक्या दराने विकलं जातंय.

कोलकाता - कोलकत्यामध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर 106.03 रुपये आणि डिझेल दर प्रतिलिटर 92.76 रुपये इतका आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies