Type Here to Get Search Results !

आजचे राशीभविष्य, शुक्रवार १५ जुलै २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!



मेष:-

कामातून समाधान मिळेल. स्वकर्तुत्ववार अधिक भर द्यावा. नोकरीच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. प्रयत्नाने बर्‍याच गोष्टी साध्य करता येतील. प्रगतीच्या दृष्टीने विचार करावा.

वृषभ:-

गुंतवणूक सावधानतेने करावी. महिलांनी कलेला वाव द्यावा. जवळचे नातेवाईक भेटतील. देवघेवीच्या बाबतीत अधिक सजग राहावे. कलाक्षेत्राला चांगला काळ आहे.  



मिथुन:-

बोलतांना संयम राखावा. मनातील भ्रामक कल्पना काढून टाकाव्यात. आत्मविश्वास कायम ठेवावा. फसव्या मित्रांपासून सावध राहावे. अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेऊ नका.

कर्क:-

मनातील धैर्य वाढवावे लागेल. मनाची द्विधावस्था दूर करावी. शक्यतो कोणत्याही वादात पडू नका. आध्यात्मिक बाबी जाणून घ्याल. कार्यालयीन वातावरण उत्तम राहील.



सिंह:-

फार रोखठोक भूमिका घेऊ नका. झोपेची तक्रार जाणवेल. हितशत्रूवर मात करता येईल. सामंजस्याने परिस्थिती हाताळा.  उगाच घुसमट होऊ देऊ नका.

कन्या:-

दिवस आपल्या मनाप्रमाणे घालवा. वेळ हातची जाऊ देऊ नका. ज्येष्ठाशी सल्लामसलत करावी. हातच्या कामात यश येईल. अधिकारी वर्गाचा सल्ला घेता येईल.



तूळ:-

विरोधाला सामोरे जावे लागू शकते. अनावश्यक खर्च त्रस्त करू शकतो. मनात उगाचच चिंता निर्माण होईल. एखादी जुनी इच्छा पूर्ण होईल. मोठ्या कामात अधिक लक्ष घालावे.

वृश्चिक:-

कामाच्या विस्ताराचा विचार कराल. मेहनतीचे योग्य फळ मिळेल. क्रोधवृत्तीत वाढ होऊ शकते. काही जुगारी निर्णय घ्यावे लागू शकतात. अचानक आलेल्या संधीचे सोने करावे.



धनू:-

आर्थिक गणित जमून येईल. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक कराल. आलेल्या संधीचे सोने करावे. कामात द्विधावस्था आड आणू नका. जुनी गुंतवणूक कमी येईल.



मकर:-

इतरांना मदत करण्याचा आनंद घ्याल.  चिकाटी सोडून चालणार नाही. आपल्या कार्यक्षेत्रात प्रयत्नशील राहावे. अंगीभूत कलांना वाव द्यावा. जवळच्या प्रवासात सतर्क राहावे.



कुंभ:-

सरकारी नियमांचे काटेकोर पालन करावे. सर्व बाबतीत प्रयत्नशील राहावे. नोकरदारांना दिलासा मिळेल. वर्तमान काळाचा जास्त विचार करावा. बोलतांना इतरांची मने दुखवू नका.


मीन:-

खाण्या-पिण्याची पथ्ये पाळावीत. क्रोधवृत्तीत वाढ होईल.  कार्यालयीन कामाबाबत अधिक दक्ष राहावे. कामाचा उत्साह वाढेल. वेळोवेळी ज्येष्ठाशी चर्चा करावी. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies