Type Here to Get Search Results !

मुख्याधापकानेच मागितली शिक्षिकेकडे लाच! जिल्हा परिषदेच्या शाळेमधील प्रकार उघडकीस

 



बुलडाणा : जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिकेला त्याच शाळेच्या लाचखोर मुख्याध्यापकाने २००० हजारांची लाच मागितल्याचा प्रकार बुलडाण्यात उघडकीस आला आहे. मुख्याध्यापकाकडे एका खाजगी व्यक्तीने माहितीच्या अधिकारात शिक्षकांच्या घरभाड्यासंदर्भात माहिती मागितली होती.


मी सत्य माहिती सादर करणार नाही. पण त्यासाठी २ हजार रुपये द्या; अशी मागणी मुख्याध्यापकाने शिक्षिकेकडे केली होती. या प्रकरणाची तक्रार एसीबीकडे येताच लाचखोर मुख्याध्यापकाला लाच घेतांना रंगेहाथ पकडले आहे.


सदर कारवाई खामगाव तालुक्यातील आवार येथील जिल्हा परिषद उच्च मराठी प्राथमिक शाळेत करण्यात आली आहे. नरहरी विश्वनाथ टिकार (५४, रा. अभय नगर, घाटपुरी नाका, बुलडाणा  असं अटक करण्यात आलेल्या लाचखोर मुख्याध्यापकाचे नाव आहे. 


सत्य माहिती सादर न करण्यासाठी या लाचखोर मुख्याध्यापकाने शिक्षेकेला २ हजार रुपये मागितले. मात्र शिक्षिकेला लाच द्यायची नसल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies