Type Here to Get Search Results !

आजचे राशीभविष्य, मंगळवार १२ जुलै २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!



मेष:-

सेवाभावी वृत्तीने कामे करावीत. उगाचच बंधनात अडकून राहू नका. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. मात्र व्यवहारी दृष्टीकोन बाजूला सारून चालणार नाही. मनमोकळे विचार करावेत.



वृषभ:-

मानापमानाच्या प्रसंगातून जावे लागू शकते. आर्थिक प्रश्न मिटतील. जवळच्या प्रवासाचा योग संभवतो. श्वसनाच्या विकारांपासून जपावे. वादाचे प्रसंग कटाक्षाने टाळावेत.



मिथुन:-

धरसोडपणे कामे करू नयेत. क्षणभराच्या आनंदाने हुरळून जाऊ नका. मानसिक शांततेला प्राधान्य द्यावे. एकसूत्री विचार करावा. कामातील बदलांकडे विशेष लक्ष ठेवा.



कर्क:-

कृतीला अधिक महत्त्व द्यावे. अति विचाराने थकवा जाणवेल. सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा. मनाच्या चंचलतेला आवर घालावी लागेल. फसव्या लोकांपासून सावध राहावे.


सिंह:-

तडजोडीला पर्याय नाही. झोपेची तक्रार जाणवेल. नवीन ओळखी होतील. विचारांची दिशा बदलावी लागेल. तरुणांचे विचार जाणून घ्यावेत.



कन्या:-

चिंतामुक्त जगावे. मनातील कल्पना कृतीत आणण्याचा प्रयत्न करावा. पत्नीच्या विचारांशी तडजोड करावी लागेल. व्यवसायातून चांगला लाभ संभवतो. अधिकारी लोकांचे मार्गदर्शन घ्यावे. 


तूळ:-

मनातील इच्छा पूर्ण होईल.  दिवसभर कामात गुंग राहाल. क्षुल्लक कारणावरून चिडचिड संभवते. शेअर्स च्या कामात यश मिळेल. आजचा दिवस लाभदायक असेल.



वृश्चिक:-

उत्साह व आत्मविश्वासाने वाटचाल कराल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. मुलांचे स्वतंत्र विचार जाणून घ्या. जोडीदाराची इच्छा जाणून घ्यावी. घेतलेल्या मदतीची जाणीव ठेवाल.



धनू:-

जोडीदाराशी अनबन होऊ शकते. घरातील कुरबुरी शांततेने हाताळा. जमिनीच्या कामात यश येईल. अचानक धनलाभाची शक्यता. मौल्यवान वस्तू सांभाळाव्यात.



मकर:-

मुलांकडे लक्ष देण्याची गरज आहे. मनातील मरगळ काढून टाकता येईल. करमणुकीत वेळ घालवावा. अधिकाराचा योग्य वापर करावा. काही धाडसी निर्णय घ्याल.



कुंभ:-

बोलतांना भडक शब्दांचा वापर टाळावा. घरातील स्वच्छतेवर अधिक लक्ष द्याल. आवडी-निवडी बाबत अधिक काटेकोर राहाल. मनातील निराशाजनक विचार काढून टाका. आपल्या मताप्रमाणे इतरांना वागायला लावाल.



मीन:-

मुलांबरोबर वेळ व्यतीत कराल. जवळच्या मित्रांची गाठ पडेल. तांत्रिक गोष्टीत रस घ्याल. मित्रांची वेळेवर मदत मिळेल. रागाला आवर घालावी लागेल.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies