Type Here to Get Search Results !

महिलेचा आक्षेपार्ह अवस्थेत व्हिडिओ बनवला म्हणून २१ वर्षीय तरुणाची...!



नांदेड : मार्लेगाव येथील एका २१ वर्षीय तरुणाची कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली होती. या तरुणाचा मृतदेह गुरूवारी बोरगाव शिवारातील एका डोहात आढळून आला होता. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी तीन संशयित आरोपींना अटक केली. सचिन मुरलीधर कदम (वय २१) असे मृत तरुणाचे नाव आहे.



याबद्दल अधिक माहिती अशी कि,  मार्लेगाव येथील सचिन हा गुरुवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास शेतात गेला होता. सायंकाळपर्यंत तो घरी परतला नाही. नातेवाईकांनी शेतात आणि गावात सर्वत्र शोध घेऊनही तो आढळून आला नाही. त्यामुळे गावातील ३० ते ४० तरुणांनी त्याचा शोध घेतला.  यानंतर रात्री १० वाजेच्या दरम्यान नदीकाठावरील बोरगाव शिवारातील डोहात सचिनचा मृतदेह आढळून आल्याची माहिती मनाठा पोलिसांना मिळाली. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयितास ताब्यातही घेतले होते.


दरम्यान, पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताची चौकशी केली असता चौकशीत संशयिताने आपणच आपल्या साथीदारांसह सचिनचा खून केला असल्याची कबुली दिली. मृत सचिनने नात्यातील एका महिलेचा महिलेचा नको त्या अवस्थेत व्हिडिओ बनवला होता. याचाच राग मनात धरून आरोपींनी सचिनचा कोयत्याने वार करून खून केला. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies