Type Here to Get Search Results !

शिवसेनेला मोठे खिंडार; बदलापुरात २५ नगरसेवक शिंदे गटात सामील!



बदलापूर : सध्या उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात टोकाचा संघर्ष सुरू झाला आहे. त्यामुळे शिवसेनेत उभी फूट निर्माण झाली आहे. त्यानंतर अनेक शिवसेना नेते, पदाधिकारी हे शिंदे गटात सामील होत आहे. आता बदलापुरातील सर्वच २५ नगरसेवक शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे बदलापुरात शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे.



आज बदलापूर पालिकेतील शिवसेनेचे सर्वच्या सर्व २५ नगरसेवक शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे बदलापुरात शिवसेनेला मोठं खिंडार पडलं आहे. त्यामुळे बदलापूरचे २५ नगरसेवक शिंदे गटात सामील झाल्याने उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जात आहे. बदलापूर शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्या नेतृत्त्वाखाली सर्व नगरसेवक आणि पदाधिकारी नंदनवन बंगल्यावर दाखल झाले.



नंदनवन येथील एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावर शिंदे यांना समर्थन देण्यासाठी पदाधिकाऱ्यांची गर्दी झाली. आज शहापूर, अंबरनाथ, मुरबाड येथील नगरसेवक,जिल्हा परिषद अध्यक्ष,उपाध्यक्ष शिंदे गटात सहाभागी झाले आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies