Type Here to Get Search Results !

संजय राऊतांच्या ईडी धाडीनंतर अजित पवारांची मोठी प्रतिक्रिया!

 


बीड: आज सकाळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी ईडीने धाड टाकली. ईडीची चौकशी अजुनही सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली.


अजित पवार म्हणाले, देशातील प्रत्येक नागरिकांची चौकशी करण्याचा अधिकार ईडीला आहे,  अनेक संस्था आणि व्यक्तींना ईडीच्या अनेक वेळा नोटीस आलेल्या आहेत. त्यांना स्वायत्तता दिलेली आहे आणि त्यांना चौकशीचा अधिकार दिलेला आहे. त्या मग आयटी असेल ईडी असेल किंवा राज्य सरकारच्या एसीबी असेल सीआयडी असेल किंवा पोलीस क्राईम ब्रँच असेल. या सर्व वेगवेगळ्या विभागांमध्ये काही जर तक्रार आली असेल तर त्याची चौकशी करण्याचा अधिकार देशातील प्रत्येक नागरिकांच्या बाबतीमध्ये आहे. आता हे नक्की काय झालेलं आहे, त्या संदर्भात जास्त अधिकारवानीने संजय राऊत सांगतील, असे वक्तव्य करत अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies