Type Here to Get Search Results !

उद्धव ठाकरेंची पुन्हा वाढली डोकेदुखी; ‘येथील’ १८ नगरसेवक शिंदे गटात होणार सामील!



मुंबई : शिवसेनेच्या जवळपास ४० आमदारांनी बंडखोरी करुन शिंदे यांना पाठिंबा दिला. भाजपच्या मदतीने शिंदे-फडणवीस सरकारने सत्तेच्या चावी हाती घेतल्या. मात्र, आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि मुंबई महापालिका निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांनी रणनीती आखण्यात सुरुवात केलीय.'मिशन मुंबई'सुरू करून शिंदे यांनी मुंबईतील शिवसेनेचे नगरसेवक फोडण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वीही मुंबई, ठाणे विभागातील आजी माजी नगरसेवकांनी शिंदे यांना समर्थन करण्याचा निर्णय घेतला होता. याच पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा मीरा- भाईंदरमध्ये शिवसेनेला खिंडार पडणार आहे. शिवसेनेचे मीरा भाईंदर महापालिकेतील विद्यमान १८ नगरसेवक तसेच शिवसेनेचे अनेक प्रमुख पदाधिकारी आज आमदार प्रताप सरनाईक  यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. हे सर्व नगरसेवक शिंदे गटात सामील होणार आहेत.



आमदार प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील लीला हॉटेलमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. मीरा भाईंदर शहरात गेल्या १३ वर्षात शिवसेना पक्ष संघटन मजबूत करण्यात व पक्ष वाढवण्यात आमदार सरनाईक यांचा मोठा वाटा आहे. मीरा भाईंदर महापालिकेतील शिवसेनेचे १८ विद्यमान नगरसेवक ,शिवसेनेचे अनेक प्रमुख पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत.



मीरा भाईंदर शहराची शिवसेनेची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली आहे. त्या कार्यकारिणीमधील अनेक प्रमुख पदाधिकारी-शिवसैनिक आज आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करणार असून शिंदे गटाला पाठिंबा देणार आहेत. (सौ. साम)


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies