Type Here to Get Search Results !

आजचे राशीभविष्य, शुक्रवार ८ जुलै २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!



मेष:-

तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल.  बोलण्यात माधुर्य ठेवाल. सामाजिक प्रश्नांवर भाष्य करू नका. चैनीच्या वस्तू खरेदी कराल. बोलण्यातून इतरांवर छाप पाडाल.


वृषभ:-

दिवस आनंदात जाईल. प्रत्येक गोष्टीचा उत्तम रसास्वाद घ्याल. गायन कलेला वेळ द्यावा. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. सर्व गोष्टींकडे आनंदी दृष्टीतून पहाल.



मिथुन:-

धाडसाने कामे हाती घ्याल. कामात द्विधावस्था आड येऊ देऊ नका. अनावश्यक खर्चाला आळा घाला. ठाम निर्णय घ्यावे लागतील. फसवणुकीपासून सावध राहा.


कर्क:-

समोरच्या व्यक्तिला गृहीत धरू नका. एखादी जुनी आकांक्षा पूर्ण होईल. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. इतरांचे मन जपण्याचा प्रयत्न करावा. घरातील मोठ्या व्यक्तींचा पाठिंबा मिळेल.



सिंह:-

प्रलंबित थकबाकी प्राप्त होईल. लहान मुलांच्यात खेळावे. जेणेकरून मनावरील ताण कमी होईल. झोपेची काहीशी तक्रार जाणवेल. मनातील निराशाजनक भाव काढून टाकावेत.


कन्या:-

सकारात्मक उर्जेने काम करावे. अधिकारी वर्गाची गाठ घेता येईल. तुमच्या मनातील इच्छेला मुरड घालू नका. त्यासाठी तुम्हाला कमीत कमी वेळ द्यावा लागू शकतो. जवळच्या व्यक्तीकडून मदत घेता येईल.



तूळ:-

उजळ बाजू लक्षात घेऊन वागावे. काही कामे तुमची चिकाटी पणाला लावू शकतात. मनातील विचारांनी गांगरून जाऊ नका. कमी श्रमातून मिळणार्‍या फायद्याकडे तुमचा कल राहील. वारसाहक्काच्या कामातून लाभ संभवतो. 


वृश्चिक:-

तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल. प्रेमाचा सुंदर आविष्कार पहायला मिळेल. जीवनसाथी बरोबर दिवस मजेत घालवाल. वरिष्ठांची मर्जी राखावी लागेल. तुमच्या कामाचे श्रेय दुसर्‍या कोणाला घेऊ देऊ नका.



धनू:-

अडचणींवर हसत-हसत मात करावी. कौटुंबिक वातावरण शांततेचे राखावे. काहीतरी नवीन करून घरच्यांना खुश कराल. केलेल्या कामातून समाधान मिळेल. देवाण-घेवाणीच्या कामात सतर्क राहावे.


मकर:-

कामाच्या व्यापामुळे त्रासून जाऊ नका. जवळच्या प्रवासात सतर्क राहावे. विचार करून साहस करावे. भागीदारीत धोरण आधीच पक्के करावे. जोडीदाराची प्राप्ती वाढेल.



कुंभ:-

तिखट व तामसी पदार्थ खाल. घरासाठी काही नवीन खरेदी केली जाईल. आरोग्यात हळूहळू सुधारणा दिसून येईल. बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे. पैसे खर्च करताना मागचा-पुढचा विचार करावा.


मीन:-

स्वभावात काहीसा चिडचिडेपणा येईल. तुमच्या स्वभावातील गोडवा सर्वांच्या नजरेत येईल. दिवस मजेत जाईल. निसर्ग सौंदर्याचा अनुभव घ्याल. जवळच्या मित्र मंडळींमध्ये वेळ घालवाल.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies