Type Here to Get Search Results !

आता शिंदे-फडणवीस सरकार पडणार...? आमदार शहाजीबापू पाटलांनी केले स्पष्ट!



मुंबई: शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह बंड केले. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी कोसळले. सध्या शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले आहे. या दरम्यान, यावेळी शहाजीबापू पाटील यांनी शिंदे-फडणवीस सरकार किती दिवस टीकेल यावर भाष्य केले आहे.



राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार काही दिवसांपूर्वी म्हणाले, हे सरकार जास्त दिवस चालणार नाही. यावर बोलताना शहाजीबापू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे, ते म्हणाले, “शरद पवार जे बोलतात नेमके त्याच्या उलटे होत असते. तसेच आताही हे सरकार काही पडणार नाही. अजून अडीच वर्ष या सरकारला धक्का लागणार नाही, असे पाटील यांनी वक्तव्य केले.



आमदार शहाजीबापू पाटील यांनी इतिहासातील निवडणुकांचे संदर्भ देत पुढे म्हणाले, १९९५ मध्ये निवडणूक झाली शरद पवार यांनी त्यावेळी राज्याचे नेतृत्व केले होते. ८० आमदार निवडून आले होते. हायकमांडने त्यावेळी सरकार बनवायचे नाही असा निर्णय घेतला. त्यावेळी विधीमंडळाच्या पहिल्या बैठकीत शरद पवार हे सरकार लवकरच पडणार असे म्हणत होते. त्यावेळी १९९९ उजडले पण सरकार काही कोसळले नाही, आताही तसेच होणार हे सरकार अजून अडीच वर्ष चालणार आहे.तसेच, अडीच वर्ष शिंदे सरकारला धक्का लागणार नाही, तर शिवसेना वाचवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी हे पाऊल उचलले असल्याचेही पाटील म्हणाले. आम्हाला त्यावेळी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी निधी दिला नाही. सगळा निधी राष्ट्रवादीच्या आमदारांना दिला. त्यामुळे शिवसेनेच्या आमदारांचे खच्चीकरण होत होते, असेही पाटील म्हणाले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies