Type Here to Get Search Results !

मुख्यमंत्री शिंदेंच्या अडचणीत वाढ; न्यायालयाकडून चौकशीचे आदेश!



पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीची चुकीची माहिती दिल्याबद्दल पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ता अभिषेक हरदास यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने या याचिकेची दखल घेतली असून या प्रकरणात चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.


एकनाथ शिंदे यांनी सन २००९, २०१४ ला १४७,कोपरी पाचपाखाडी विधानसभा निवडणुकीकरिता नामनिर्देशन पत्रा सोबत शपथपत्र सादर केले आहे. त्यानंतर त्यांनी २०१९ ला १४७,कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीकरिता नामनिर्देशन पत्रा सोबत शपथपत्र सादर केले. एकनाथ शिंदे यांनी सन २०१४ व २०१९ मध्ये निवडणुकीकरीता दिलेल्या नामनिर्देशनमध्ये अनेक तफावती दिसून येत असल्याचे या याचिकेत म्हटले आहे.


दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाला चुकीची माहिती दिली असल्याचा आरोप या याचिकेत केला आहे. या याचिकेची दखल आता न्यायालयाने घेतली असून या प्रकरणात चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies