कारवरील ताबा सुटल्याने ४ तरूणांचा जागीच मृत्यू!गोंदिया : गोंदिया  जिल्‍ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या खोबा गावाजवळ रात्री झालेल्या अपघातात गोंदिया जिल्‍ह्याच्या आमगाव तालुक्यातील चार तरुणांचा मृत्यू झाला. या मृतकामध्ये रामकृष्ण बिसेन (वय २४), सचिन कटरे (वय २४), संदीप सोनवाने (वय १८) व निलेश तुरकर (वय २७) यांचा समावेश आहे. तर प्रदीप बिसेन (वय २४) हा तरुण गंभीर जखमी आहे.याबद्दल अधिक  अहिती अशी कि, आंमगाव तालुक्यातील पाच तरुण नवेगावबांध येथे सोलर पंप फिटींग करण्यासाठी चारचाकी वाहनाने गेले होते. सोलर फिटींगचे कामे आटोपुन हे पाचही तरुण रात्री परत येत होते. दरम्‍यान अचानक गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी रस्त्याच्या खाली आपटुन गाडीचा चुरा झाला. या अपघातात पाच तरुणांपैकी चार तरुणांचा घटनास्‍थळीच मृत्यू झाला.दरम्यान,  जखमींवर गोंदियातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured