धक्कादायक! ‘या’ कारणामुळे, आईनेच मुलांना काढले विक्रीला!जळगाव : पोटच्या मुलांची विक्री करतांना आईला ताब्यात घेतल्याची घटना अमळनेर येथे घडली. पतीचा कोरोनात मृत्यू झाल्याने सात मुलांचा सांभाळ करणे तिला कठीण जात होते. यामुळे आईनेच पोटच्‍या मुलांना विक्री काढले. याबद्दल अधिक माहिती अशी कि, अमळनेर शहरात गांधलीपुरा भागातील सुभाष चौकात एक महिला काही मुलानां विक्री करत असल्याचे समोर आले. अधिक तपासासाठी पो. कॉ. नाजिमा पिंजारी, दिपक माळी, रविंद्र पाटील यांचे पथक सदर महिलेचा शोध घेत तिला गाठले. माहिती घेवून तिचे जवळील ७ मुलांसह पोलीस स्टेशनला हजर केले. यावेळी स्वतः हिराबाई देवा गायकवाड (वय ४०, रा. बेघर फिरस्ते) व सोबत ३ मुली, ४ मुले यांना पोलीस स्टेशनला आणण्यात आले.दरम्यान, सदर महिलेच्या ताब्यातील मुलांबाबत अधिक विचारपुस करुन चौकशी केली असता सदर मुले व मुली त्या महिलेचे अपत्य असून तिचे पती कोरोना काळात कोविड आजाराने मयत झाले. यामुळेच तिच्‍याकडे स्‍वतःचे व मुलांच्‍या उपजिविकेसाठी पुरेसे साधन नसल्याने ती मुलांना इच्छुक लोकांना विक्री करत होती. भविष्यात मुलांना विकुन टाकण्याची शक्यता असल्याने तिच्‍या ताब्यातील ३ मुली व ४ मुले व तिच्‍या पालन पोषणकरीता सदर बालकांची काळजी घेण्यासाठी व त्या बालकांना संरक्षण मिळणेकरीता त्यांना बालकल्याण समिती जळगाव येथे हजर करून महिला बाल सुधारगृहात पाठविण्यात आले. 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured