Type Here to Get Search Results !

धावत्या कारमध्ये १६ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार!



नवी दिल्ल : दिल्लीमध्ये एका अल्पवयीन १६ वर्षीय मुलीवर धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली. 



याबद्दल अधिक माहिती अशी कि,  ही घटना ६ जुलै रोजी घडली. त्या दिवशी संध्याकाळी सहा वाजता ही मुलगी वसंत विहार परिसरात दोन ओळखीच्या लोकांना भेटली. ती आपल्या मित्राच्या घरून परतत होती. त्यानंतर ही मुलगी व तिच्यासोबतचे दोघेजण परिसरात भटकंती करत राहिले. तिच्यासोबतच्या दोघांनी आपल्या आणखी एका मित्राला फोन केला. तो कार घेऊन आला. त्यानंतर या तिघांनी त्या मुलीला एक पेय दिले व तिला कारमध्ये बसविले. त्यानंतर त्यांनी आपली कार दिल्ली शहरात अनेक ठिकाणी नेली. धावत्या कारमध्ये तिच्यावर सामूहिक बलात्कार केल. तसेच या गैरकृत्याचे व्हिडीओ चित्रीकरणही आरोपींनी केले.



दरम्यान,  सदर प्रकरणाची माहिती दोन दिवसांनी पोलिसांना कळविण्यात आली. पीडित मुलीला उपचारांसाठी दाखल केले होते, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies