Type Here to Get Search Results !

महिलेचे अश्लील फोटो काढत केली शारिरीक सुखाची मागणी अन...!



माणगाव : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात कॉफीत गुंगीचे औषध टाकून एका तरुणाने महिलेचे अश्लील फोटो काढण्याचा प्रकार घडला आहे. अश्लील फोटो काढून महिलेला ब्लॅकमेल करत तिच्यासह मुलीसोबत शारिरीक सुखाची मागणी एका नराधमाने केली होती. अनंत बासू मातारी असे आरोपीचे नाव असून त्याच्या विरोधात माणगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.



याबद्दल धिक माहिती अशी कि, आरोपी अनंत बासूने  २०१५ पासून पीडित महिलेला मानसिक त्रास दिला. बासूच्या जाचाला कंटाळून पीडित महिलेने दोन वर्षांपूर्वी नोकरी सोडली. त्यानंतरही बासू पीडितेला त्रास देऊन ब्लॅकमेल करत होता. त्यानंतर आरोपी बासूने पीडितेकडून ६ लाख ७० हजार रुपये उकळले. तसेच, पीडितेकडे आणि तिच्या मुलीसोबत शारिरीक संबंध ठेवण्याची मागणी केली. 



दरम्यान,  पीडितेने या प्रकरणाची गंभीर दखल घेत झालेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर आरोपी विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies