Type Here to Get Search Results !

पेट्रोल डिझेल होणार स्वस्त?; जाणून घ्या आजचा दर!



नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत चढ-उतार होत आहे. गुरूवारी सकाळी सुद्धा कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाली. ब्रेंट क्रूड ऑईलचे दर प्रतिबॅरेल 100 डॉलरच्या खाली राहिले. 



आंतराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाची किंमतीत घट झाली  असली तरी, भारताच्या देशांतर्गत बाजारातील पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतींवर त्याचा परिणाम झाला नाही. गुरूवारी सकाळी तेल कंपन्यांनी इंधनाचे दर जारी केले. आज पेट्रोल डिझेलच्या किमतीत कोणताही बदल केलेला नाही. 



दरम्यान,  गुरुवारी सकाळी जागतिक बाजारात ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 99.39 डॉलर इतकी होती. तर WTI ची किंमत प्रति बॅरल 95.89 डॉलर इतकी आहे. तसेच, गुरूवारी सकाळी जारी करण्यात आलेल्या नव्या दरानुसार दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 96.72 रुपये इतका आहे. तर डिझेलचा दर प्रति लिटर 89.62 रुपये आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 109.27 रुपये असून, डिझेलचा दर प्रति लिटर 97.28 रुपये एवढा आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies