Type Here to Get Search Results !

मुख्यमंत्री शिंदे आज पंतप्रधान मोदींची घेणार भेट ; ‘कोणत्या’ मुद्द्यावर करणार चर्चा !


नवी दिल्ली: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काल दिल्लीत दाखल झाले. काल दोन्ही नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. आज मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत. अमित शाह यांच्यासोबतच्या भेटीत मंत्रिमंडळ विस्तार तसेच कायदेशीर लढ्याबाबत चर्चा झाल्याची शक्यता आहे. आज पंतप्रधान मोदी यांच्यासोबत बैठकीत देखील या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कालपासून दौन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. मुख्यंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे.


मुख्यमंत्री दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आज पंतप्रधान मोदी यांच्यासह देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची देखील भेट घेणार आहेत. त्यानंतर ते दिल्लीहून थेट पुण्याला येतील. पुण्याहून मुख्यमंत्री पंढरपूरला जाणार आहेत. तिथे उद्या आषाढी एकादशीनिमित्त त्यांच्या हस्ते आषाढीनिमित्त विठ्ठलाची पूजा होईल.


दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीतून रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पुणे विमानतळावर पोहचतील अशी माहिती समोर येत  आहे.  पुणे विमानतळावरून ते आषाढी एकादशीनिमित्त करण्यात येणाऱ्या शासकीय पुजेसाठी पंढरपूरला रवाना होतील. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies