"आज पृथ्वीवरील आमचा शेवटचा दिवस...” अशी पोस्ट शेअर करत प्रेमयुगुलाची आत्महत्या!नवी दिल्ली - नालंदा जिल्ह्यातील बिहार पोलीस स्टेशन हद्दीतील एका हॉटेलमध्ये तरुण आणि तरुणीचा मृतदेह आढळून आला. यातील तरुण नवाडा येथील रहिवासी होता तर तरुणी लखीसराय येथील रहिवासी होती. तसेच,  आत्महत्येपूर्वी 22 वर्षीय रॉकीने त्याच्या फेसबुक अकाऊंटवरून "आज पृथ्वीवरील आमचा शेवटचा दिवस आहे" अशी पोस्ट करत काही फोटो शेअर केले होते.22 वर्षीय रॉकी हा नवादा जिल्ह्यातील काशीचक पोलीस स्टेशन हद्दीतील मधेपूर गावातील रहिवासी टुन्ना महतो यांचा मुलगा होता. लखीसराय येथील 19 वर्षीय सोनम कुमारी ही त्याची गर्लफ्रेंड होती. रॉकी आणि सोनमचे प्रेमप्रकरण अनेक दिवसांपासून सुरू होते. महिनाभरापूर्वी रॉकी सोनमसोबत आसनसोलमधून फरार झाला होता. नातेवाईकांनी समजूत काढल्यानंतर दोघेही घरी आले होते.त्यानंतर 3 जुलै रोजी रॉकी गावातील मुलीच्या लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी खडगपूर (बंगाल) येथे गेला होता. 6 जुलै रोजी लग्नानंतर तो साथीदारांसह तेथून निघून गेला, मात्र घरी येण्याऐवजी तो आसनसोलमध्येच राहिला. तेथे त्याने सोनमशी संपर्क साधला. आसनसोल ते पाटणा तिकीट काढले होते, मात्र पाटण्याला पोहोचण्यापूर्वी ते सोमवारी सकाळी 6 ते 7 च्या सुमारास बिहार शरीफ येथे उतरून एका हॉटेलमध्ये गेले. मंगळवारी सकाळी दोघांचे मृतदेह हॉटेलच्या खोलीत आढळून आले.दरम्यान, पोलिसांनी दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात दिले. तसेच हत्या की आत्महत्या याचा तपास पोलीस करत आहेत. 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured