पेट्रोल-डिझेलचे दर झाले कमी ? जाणून घ्या आजचे दर!नवी दिल्ली - गेल्या दोन महिन्यांपासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. सर्वसामान्यांना दिलासा देत केंद्र सरकारने मे महिन्यात पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली होती. सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 8 रुपयांनी आणि डिझेलवरील 6 रुपयांनी कमी केले होते. तेव्हापासून देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.सध्या, नुकतीच महाराष्ट्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅटमध्ये कपात केली होती, त्यानंतर राज्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले आहेत. राज्य सरकारने पेट्रोलवरील व्हॅटमध्ये 5 रुपयांनी आणि डिझेलवर 3 रुपयांनी कपात केली.तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

दिल्लीत पेट्रोलचा दर 96.72 रुपये तर डिझेलचा दर 89.62 रुपये प्रति लिटर आहे.

मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

जयपूरमध्ये पेट्रोल 108.48 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

तिरुअनंतपुरममध्ये पेट्रोलचा दर 107.71 रुपये आणि डिझेलचा दर 96.52 रुपये प्रति लिटर आहे.

पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल 84.10रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

बंगळुरूमध्ये पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

हैदराबादमध्ये पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.

चंदीगडमध्ये पेट्रोलचा दर 96.20 रुपये आणि डिझेलचा दर 84.26 रुपये प्रति लिटर आहे.Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured