Type Here to Get Search Results !

दुचाकी स्लिप होऊन अपघात; अपघातात महिलेचा मृत्यू!



अकोला : अकोला जिल्ह्यात पावसामुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. अशातच ट्रिपलशीट दुचाकी स्लिप होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात विवाहित महिलेचा मृत्यु झाला.


 

याबद्दल अधिक माहिती अशी कि, जिल्ह्यातील टाकळी खोजबोळ येथील मुकेश बांगर पत्नी शारदासह 2 वर्षीच्या चिमुकल्याला घेऊन दुचाकीने उरळ ते मनसगांव मार्गाने प्रवास करीत होते. दुचाकीवरून प्रवास करीत असतांना खराब रस्त्यामुळे दुचाकी स्लिप झाली. अन् चिमुकल्यासह दोघे पती पत्नी रस्त्यावर कोसळले. यादरम्यान, आपल्या 2 वर्षाच्या मुलाला वाचवताना महिलेचा मृत्यू झाला. शारदा मुकेश बांगर असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे आहे. 



दरम्यान, शारदा यांचे पती मुकेश बांगर आणि मुलगा सुखरूप असून त्यांना किरकोळ दुखापत झाली. मृतक शारदा बांगर यांना ७ आणि ५ वर्षाच्या दोन मुली असून २ वर्षाचा मुलगा देखील आहे. अचानक त्यांचा अपघाती मृत्यू झाल्याने बांगर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies