व्हिडीओ: वडिलांच्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी तरुणाच्या डोळ्यावर झाडली गोळी!नवी दिल्ली: जहांगीरपुरी भागात एका अल्पवयीन मुलाने वडिलांना झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी, एका तरुणावर गोळी झाडली आहे. घटनेच्या वेळी जखमी मुलगा पार्कजवळ बसला होता. यावेळी तीन अल्पवयीन मुले तेथे आले आणि त्यांतील एकाने त्याच्यावर गोळी झाडली व तेथून पळ काढला. गोळी जखमी तरुणाच्या डोळ्यावर लागली आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. पीडित तरुणाने दिलेली माहिती अशी कि,  सायंकाळी 4.45 वाजताच्या सुमारास, तो एच-3 ब्लॉकमध्ये पार्कजवळ बसलेला होता. याच वेळी त्याच्या ओळखीचे तीन अल्पवयीन मुले तेथे आले. त्यातील एकाने त्याच्या चेहऱ्यावर गोळी झाडली आणि सर्व जण तेथून पळून गेले.दरम्यान,  याप्रकरणी जहांगीरपुरी पोलिसांनी आयपीसीच्या कलम 307 नुसार, गुन्हा दाखल केला आहे. तसेच विशेष स्टाफने 4 सीसीएलला अटकही केली असून गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेले देशी पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. याशीवाय जखमी तरुणाने जवळपास सात महिन्यांपूर्वी पकडण्यात आलेल्या एका अल्पवयीन मुलाच्या वडिलांना मारहाण केली होती आणि आज हे सर्वजण त्याचा बदला घेण्यासाठी आले होते, असे स्पष्ट केले.(सौ लोकमत)


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured