पुन्हा औरंगाबाद व उस्मानाबादचे केले नामांतर; शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय!

 


मुंबई:  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळाने आपल्या तिसऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय घेतले आहेत. या बैठकीत ठाकरे सरकारने घेतलेला औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर तर उस्मानाबादचे नामांतर धाराशीव करण्याचा निर्णय पुन्हा घेण्यात आला. ठाकरे सरकारने शेवटच्या क्षणी घेतलेला हा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने स्थगित केला होता. आजच्या बैठकीत औरंगाबाद, उस्मानाबाद शहराच्या नामांतरासह नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव देण्याचा पुनर्निणय घेण्यात आला.दरम्यान, लवकरच ठराव करुन प्रस्ताव केंद्राला पाठवणार असल्याची माहिती बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. कायदेशीर पेच निर्माण होऊ नये म्हणून ठाकरे सरकारने घेतलेल्या निर्णयाला स्थगिती दिली होती, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured