Type Here to Get Search Results !

"मागचं नालायक सरकार होतं, त्यांनी एकाही..."! ‘यांचे’ वक्तव्य चर्चेत!

 


मुंबई: शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील वाय.बी. चव्हाण केंद्रात कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्रि देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित होते. यावेळी आपलं मनोगत व्यक्त करताना विनायक मेटेंनी मोठं वक्तव्य केलं आहे. "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, त्यांचा आम्हाला आदर आहे पण आमच्या मनात तुम्हीच (देवेंद्र फडणवीस) मुख्यमंत्री आहात" असे वक्तव्य शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर केले.विनायक मेटे म्हणाले की, फडणवीस काय बोलणार हे ऐकण्यासाठी मी देखील उत्सुक आहे. असे म्हणायला हरकत नाही की विनायक मेटे यांचा पायगुण चांगला आहे. अडीच वर्ष तुम्ही भेटला नाहीत, रात्री वेशांतर करून तुम्ही रणनीती करायचा, पण शेवटी तुम्ही स्वतःचं सरकार आणून दाखवलं. तुम्ही काय बोलणार हे ऐकायला सगळे इथे आले आहेत. मी सुद्धा तुमचं ऐकायला उत्सुक आहे की, राज्याला तुम्ही काय मार्गदर्शन करणार आहात. गेल्या अनेक वर्षांमध्ये मराठा समाजाची मागणी कोणीही पहिली नाही, तुम्ही तुमच्या सरकारमध्ये हातंचं घातलं नाही पण आरक्षण देण्याचं काम तुम्ही केले. मागचं नालायक सरकार होतं, त्यांनी एकाही समाजाला न्याय दिला नाही. ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण यांनी घालवलं. सगळ्या समाजाच्या लोकांवर अन्याय करण्याचं काम यांनी केले. गेल्या अडीच वर्षात केवळ भ्रष्टाचार गेल्या सरकारने केलं असा गंभीर आरोप त्यांनी केली आहे.सोबतच विनायक मेटे म्हणाले की, मला तुमच्या बदल आम्हाला खात्री आहे. तुम्ही शब्द दिला होता, सरकारमध्ये घेण्याचा ते जरी पाळले नसतील तरी आम्ही तुमच्यासोबत असू. 2014 मध्ये सत्तेमधून मी विरोधी पक्षात गेलो, मला आणि लोकांना तुमचं ऐकायचं आहे. तुम्ही आम्हाला न्याय दया, अन्याय द्या पण आम्ही शेवटपर्यंत तुमच्या सोबत राहणार आहोत. आम्ही वेडे मराठे आहोत, प्रेम किती करायला लागलं तर कळत नाही. तुम्ही श्रीरामासारखे अनेक विकासाचे पूल बांधाल आणि त्यात खारीचा वाटा शिवसंग्रामचा असणार आहे. पण त्या खरीला विसरू नका, त्याला नेहमी जवळ ठेवा असं विनायक मेटे म्हणाले आहेत. यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच सुपर सीएम असल्याची चर्चा सुरू असताना आता मेटे यांनी केलेले वक्तव्य चर्चेत आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies