Type Here to Get Search Results !

अभिनेता टायगर श्रॉफ व अभिनेत्री दिशा पाटनीचा ब्रेकअप!



मुंबई: बॉलिवूड जगतातील 'अॅक्शन' स्टार टायगर श्रॉफ आणि फिटनेस क्वीन दिशा पाटनी यांचा ब्रेकअप झाल्याची माहिती समोर येत आहे. टायगर आणि दिशा हे दोघे अनेक इव्हेंटमध्ये एकत्र दिसले आहेत. पण आता ६ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांच्यात दुरावा निर्माण झाला आहे, अशी माहिती समोर येत आहे.



रिपोर्टनुसार, दिशा-टायगर हे दोघे सहा वर्षांनंतर वेगळे होणार आहेत. त्यांच्यातील प्रेमात दुरावा निर्माण झाला, दिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ यांच्यात गेल्या वर्षभरापासून बिनसले आहे. त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे. मात्र, कधीच त्यांनी याबाबत मीडियासमोर किंवा इव्हेंटमध्ये जाहीरपणे सांगितले नाही. 



दिशा आणि टायगरने नाते संपुष्टात आणण्याचा निर्णय का घेतला किंवा त्यांच्यात नेमके काय झाले, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. एका मुलाखतीत टायगरच्या जवळच्या एका मित्राने या दोघांच्या नात्यात दुरावा आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.



दरम्यान, दिशा आणि टायगर यांच्यात प्रेमाचं नातं आता संपुष्टात आले तरीही ते दोघे एकमेकांचे चांगले मित्र आहेत. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies