राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या मीराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये मिळवले सुवर्णपदक!नवी दिल्ली:  बर्मिंगहॅम येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या मीराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये महिलांच्या ४९ किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकले आहे. मीराबाईने सुवर्ण पदक जिंकल्यानंतर देशभरातून तिचे कौतुक होत आहे. मीराबाई चानूने स्नॅचच्या पहिल्याच प्रयत्नात यशस्वीपणे ८४ किलो वजन उचलले. मीराबाई चानूने दुसऱ्या प्रयत्नात यशस्वीरित्या ८८ किलो वजन उचलले. मीराबाईने उत्कृष्ट कामगिरी करत ऑलिम्पिक मधला तिचा रेकॉर्ड मोडला आहे. मात्र, मीराबाईला तिसऱ्या प्रयत्नात ९० किलो वजन उचलता आले नाही.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured