Type Here to Get Search Results !

'या' दोन विचारांवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकत्र आले: ‘यांचे’ वक्तव्य चर्चेत!



डोंबिवली - शिंदे सरकार स्थापन होताच चव्हाण यांनी डोंबिवली मधील आपल्या कार्यालयात हजेरी लावली आणि भाजप कार्यकर्त्यांनी, समर्थकांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी त्यांनी हिंदुत्व आणि विकास या दोन विचारांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र आले आहेत असे सांगितले.



आमदार चव्हाण यांनी सांगितले की, देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला त्यांच्या वागणुकीतून पक्षासाठी त्याग व समर्पण भावनेचा आदर्श घालून दिला आहे. त्याच आदर्शवर आपण एक कार्यकर्ता म्हणून वाटचाल करणे आवश्यक असून ते करत असताना हिंदुत्व आणि विकास हे समांतर नेण्याचे धोरण आपल्याला पुढे घेऊन जायचे आहे असे आमदार रविंद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.



दरम्यान, रविंद्र चव्हाण आज डोंबिवलीत  आले होते.  त्यांचे भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्ह्याच्या वतीने आज शहरात स्वागत करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies