Type Here to Get Search Results !

शिवसेनेला धक्का! ‘येथील’ ६६ नगरसेवकांचा शिंदे गटाला पाठिंबा!

 


मुंबई: ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या ठाणे महानगरपालिकेतील ६७ नगरसेवक पैकी ६६ नगरसेवकांनी काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नंदनवन बंगल्यात जाऊन भेट घेतली असता, ६६ माजी नगरसेवक हे शिंदे गटात सहभागी झाले आहेत


६७ नगरसेवकांपैकी खासदार राजन विचारे यांच्या पत्नी नंदिनी विचारे या मात्र शिवसेनेतच राहिल्या आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गट आता अशी दुफळी ठाण्यात निर्माण झाल्याचे चित्र या भेटीमुळे दिसून येत आहे.


दरम्यान, ठाण्यातील नगरसेवकांनी काल एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies