शिंदे गटाची शिवसेनेची नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर; महत्वाच्या पदांवर ज्येष्ठ नेत्यांची नियुक्ती!


मुंबई : शिवसेनेचे समर्थक आता एकनाथ शिंदे गटात सामील होण्यास सुरुवात झाली आहे. आमची शिवसेना खरी, असा कांगावा राजकीय वर्तुळात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून सुरु आहे. आता कोणाची शिवसेना खरी आहे ? हे कोर्टाच्या निकालानंतरच स्पष्ट होईल. याच पार्श्वभूमीवर आता एकनाथ शिंदे गटाने नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे.एकनाथ शिंदे गटाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून महत्वाच्या पदांवर ज्येष्ठ नेत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. तर शिवसेनेच्या मुख्य प्रवक्तेपदी दीपक केसरकर यांची नियुक्ती केली आहे. शिवसेनेच्या नेतेपदी रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची नियुक्ती केली आहे. तसेच उपनेतेपदाची जबाबदारी यशवंत जाधव,गुलाबराव पाटील, उदय सामंत, शरद पोंक्षे,तानाजी सावंत,विजय नहाटा,शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर सोपवण्यात आली आहे. शिवसेना पक्ष प्रमुखपदाबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. दरम्यान, मुंबई, ठाणे, मिरा-भाईंदर, पालघर, रत्तागिरी, बदलापूर, लातूर अशा विविध जिल्ह्यातील आजी-माजी नगरसेवक एकनाथ शिंदे गटात सामील होत आहेत.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured