Type Here to Get Search Results !

“संघर्षाची तयारी ठेवा, सगळ्यांना पुन्हा लढायचं आहे”: उद्धव ठाकरे!



मुंबई: उद्धव ठाकरे यांनी आज, मंगळवारी दुपारी मातोश्री या निवासस्थानी माजी आमदारांची बैठक बोलावली. संघर्षाची तयारी ठेवा, सगळ्यांना पुन्हा लढायचं आहे, असे उद्धव ठाकरे यांनी उपस्थित माजी आमदारांना सांगितले. यावेळी त्यांनी पुन्हा 'एकला चलो रे'चा नारा दिला.



शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज, बुधवारी दुपारी माजी आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला ३० ते ३५ माजी आमदार उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी माजी आमदारांना तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. यावेळी ठाकरेंनी पुन्हा एकला चलो रे चा नारा दिला. संघर्षाची तयारी ठेवा, आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा लढायचं आहे. आता आपली वारंवार बैठक होणार आहे. तुमचे मूळ प्रश्न आम्ही सोडवणार आहोत, असा विश्वासही त्यांनी उपस्थित माजी आमदारांना दिला.



दरम्यान, शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर जवळपास ४० हून अधिक आमदार शिंदे गटात सहभागी झाले आहेत.. शिवसेनेतील ही गळती अद्याप थांबलेली नाही. त्यामुळे, शिवसेनेला पुन्हा उभारी मिळवून देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रयत्न करत आहेत. मुंबईतील मातोश्रीवर ठिकठिकाणचे नगरसेवक, पदाधिकारी, जिल्हा संपर्कप्रमुख, तालुकाप्रमुख, माजी आमदार आदींच्या बैठका घेत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies