Type Here to Get Search Results !

‘या’ कारणामुळे इलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेण्याचा करार केला रद्द!



सॅन फ्रान्सिस्को:  इलॉन मस्कने ट्विटर विकत घेण्याचा करार रद्द केला असल्याचे समोर आले आहे. इलॉन मस्क यांना ट्विटर ४४ अब्ज डॉलर्संना विकत घ्यायचे होते. पण त्यांनी हा करार रद्द केला आहे. हा करार रद्दला मस्क यांनी ट्विटरला जबाबदार धरले आहे.


बनावट अकाउंटबाबत माहिती देण्यात ट्विटर अपयशी ठरल्याचे मस्क यांनी सांगितले. ट्विटर विलीनीकरणाच्या अनेक अटींचा भंग केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. 



इलॉन मस्क यांच्या वकिलांनी एक याचिका दाखल केली आहे. या याचिकेत, वारंवार विनंती करूनही, ट्विटर अयशस्वी झाले किंवा कंपनीच्या व्यावसायिक कामगिरीसाठी आवश्यक असलेल्या बनावट किंवा स्पॅम अकाउंटबद्दल माहिती देण्यास नकार दिला. फाइलिंगमध्ये ट्विटरवर कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ट्विटरने खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती दिली आहे ज्यावर मस्क यांनी विलीनीकरणाचा करार रद्द करण्याचा निर्णय घेतला, असेही या याचिकत म्हटले आहे.


एप्रिलमध्ये इलॉन मस्क यांनी ट्विटर ४४ अब्ज डॉलर्समध्ये खरेदी करण्याची घोषणा केली होती. यानंतर ट्विटर आणि इलॉन मस्क यांच्यात बोलणी सुरू झाली होती. पण पुढे मस्क यांनी नंतर करार रद्द केला. हा करार रद्द करण्यासाठी इलॉन मस्क यांना मोठी रक्कम मोजावी लागू शकते, असे सांगण्यात येत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies