Type Here to Get Search Results !

१० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रेल्वेत नोकरीची संधी; जाणून घ्या!

 


मुंबई: रेल्वे भरती विभागाकडून उत्तर-मध्य रेल्वेमध्ये अप्रेंटिस पदासाठी इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १ ऑगस्ट २०२२ आहे.उत्तर मध्य रेल्वेमध्ये रेल्वेमध्ये अप्रेंटिस पदासाठी  १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रेल्वे भरती विभागाकडून भरती जाहीर करण्यात आली आहे.  इच्छुक उमेदवारांना १ ऑगस्ट २०२२ पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. इच्छुक किंवा पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट rrcpryj.org वर भेट देऊन संबंधित पदांसाठी ऑनलाइन अर्ज करावेत.

या भरतीद्वारे एकूण १६५९ पदे भरली जाणार आहेत. त्यात फिटर, प्लंबर, इलेक्ट्रिशियन, पेंटरसह अनेक ट्रेडच्या पदांचा समावेश आहे. त्यातील ७०३ पदे ही प्रयागराज, ६६० पदे झाशी आणि २९६ पदे आग्राकरिता आहेत.या पदांसाठी संबंधित उमेदवार १० वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय उत्तीर्ण असावेत. तर उमेदवाराचे २४ वर्षांपर्यंत असावे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी १०० रुपये शुल्क जमा करावे लागणार आहे.खालीलप्रमाणे करावा अर्ज:

अधिकृत बेवसाइट rrcpryj.org ला भेट द्या. त्यानंतर अप्रेंटिस भरतीसाठी अॅप्लिकेशन फॉर्मच्या लिंकवर जाऊन क्लिक करावे. नवीन पेज ओपनहोईल. त्यात उमेदवारांना आवश्यक माहिती भरावी. त्यानंतर रजिस्ट्रेशन होईल. क्रेडेंशियल टाकल्यानंतर लॉग-इन करून अर्ज भरावा. त्यानंतर संबंधित आवश्यक कागदपत्रे अपलोड करून शुल्क जमा करावे. अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies