सोलापूर : भाजपचे सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा बेडरुममधील महिलेसोबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या सदर व्हिडीओतील महिलेने देशमूख यांनी फसवणूक केल्याचा आरोप केला आहे.त्यानंतर वरिष्ठाच्या आदेशानंतर श्रीकांत देशमुख यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे.
सदर व्हिडीओत महिला आरोप करताना म्हणते, 'हा जो माणूस आहे, नाव श्रीकांत देशमुख आहे. यानं मला फसवलं आहे. हा बायकोबरोबरच संबंध ठेवून माझ्याशी संबंध ठेवतोय. लग्न करतोय हा'. असे आरोप महिलेने देशमुख यांच्यावर केले.
दरम्यान, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजपचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी राजीनामा दिला आहे. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. श्रीकांत देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर सोलापूरच्या राजकारणात उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे.
श्रीकांत देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर चंद्रकांत पाटील यांना सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाचा तात्पुरता पदभार हा सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष विक्रम देशमुख यांच्याकडे सोपविला आहे.