Type Here to Get Search Results !

व्हिडीओ: राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेदरम्यान बॉक्सरचा मृत्यू! आयोजकांवर गुन्हा दाखल!



बंगळुरू, कर्नाटक:  बंगळुरू येथील राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेदरम्यान एका बॉक्सरचा मृत्यू झाला आहे. यानंतर कर्नाटक पोलिसांनी आयोजकांवर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला. निखिल सुरेश (२३) असे या बॉक्सरचे नाव आहे. एका बॉक्सिंग मॅचदरम्यान प्रतिस्पर्धी बॉक्सरने निखिलच्या चेहऱ्यावर जोरदार पंच मारला, यात जखमी झालेला निखिल सुरेश हा दोन दिवस कोमात राहिला, त्यानंतर त्याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. 



या दोन्ही बॉक्सर्सच्या लढतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दोन्ही बॉक्सर एकमेकांना पंच मारताना दिसत आहेत.परंतु,  यादरम्यान प्रतिस्पर्धी बॉक्सरने निखीलच्या चेहऱ्यावर जोरदार पंच मारला, यात निखिल एका पंचानंतर खाली पडला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी असलेल्या प्रतिस्पर्धी खेळाडूविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कर्नाटकच्या के-१ असोसिएशनने ही स्पर्धा आयोजित केली होती. आपत्कालीन उपचार सुविधांशिवाय ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. निखिलला दुखापत झाली तेव्हा रुग्णवाहिका आणि स्ट्रेचरही नव्हते.

पहा व्हिडीओ:


याबद्दल अधिक माहिती अशी कि,  ही बाब रविवार 10 जुलैची आहे. जेव्हा बंगळुरूच्या जनभारती पोलिस स्टेशन हद्दीतील परिसरात किक बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. एका सामन्यात जेव्हा नवीन आणि निखिल नावाचे खेळाडू एकमेकांशी भांडत होते, तेव्हा निखिल नवीनच्या एका ठोसेने जमिनीवर पडला. अनेक प्रयत्न करूनही जेव्हा निखिलला जाग आली नाही तेव्हा त्याला रुग्णालयात नेले असता दोन दिवस कोमात राहिल्यानंतर त्याचा मृत्यू झाला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies