प्रसिद्ध उद्योगपती अविनाश भोसले यांचे हेलिकॉप्टरही CBIकडून जप्त!पुणे: पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती अविनाश भोसले यांचे हेलिकॉप्टर काल सीबीआयकडून जप्त करण्यात आले आहे. अविनाश भोसले येस बँक आणि डीएचएफएल गैरव्यवहार प्रकरणात अटकेत आहेत. अविनाश भोसले हे पुण्यातील बांधकाम व्यवसायातील मोठे नाव आहे. ते सध्या अटकेत आहेत. डीएचएफएल आणि येस बँकेशी संबंधित घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने अविनाश भोसले यांना अटक केली आहे. दरम्यान, अविनाश भोसले यांना २६ मे रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना १० दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली होती. त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने भोसले यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर आज त्यांचे खासगी हेलिकॉप्टर जप्त करण्यात आले आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured