“...मंत्रिमंडळ विस्तार होईल”:CM एकनाथ शिंदे यांनी केले स्पष्ट!मुंबई : एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे समर्थक १६ आमदारांवर विधानसभा सदस्याची अपात्रतेची कारवाई व्हावी, यासाठी शिवसेनेने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. त्यामुळे  सुप्रीम कोर्टाच्या आजच्या निर्णयावर सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु, आज सुप्रीम कोर्टाने परिस्थिती जशी आहे तशी ठेवत पुढील सुनावणी १ ऑगस्टला होणार असल्याचे सांगितले आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. आमचा न्याय प्रक्रियेवर पूर्ण विश्वास आहे. सुप्रीम कोर्टातील सुनावणी दिलासादायक आहे. लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, असा शिंदे यांनी व्यक्त केला आहे.यावेळी शिंदे म्हणाले, आम्ही पूर्ण कायदेशीर लढा लढतोय. आम्ही कायदेशीरपणे पूर्णत: योग्य आहोत. आमचा न्यायप्रक्रियेवर पूर्ण विश्वास आहे. सुप्रीम कोर्टातील सुनावणी दिलासादायक आहे. लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल. राज्यातील पूरस्थितीचा आढावा रोज घेत आहोत. मंत्रालयात यासाठीच जात आहे. ओबीसी आरक्षण संर्दभातील अहवाल चांगला बनवण्यात आला. त्यामुळे निकाल आमच्याच बाजूने असणार आहे, असे शिंदे यांनी वक्तव्य केले.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured